
about
श्री भैरवनाथ जोगेश्वरी ही एक संस्था आहे. जी उपेक्षित लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. २०२२ मध्ये स्थापित, आम्ही शिक्षण, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, दारिद्र्य निर्मूलन इ यासारख्या विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आमचा दृष्टीकोन असमानता आणि गरिबीच्या मूळ कारणांना संबोधित करणारे वाढीव उपाय तयार करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसह तळागाळातील पुढाकारांना जोडतो. आमचा सामूहिक कृतीच्या सामर्थ्यावर विश्वास आहे आणि आम्ही सर्वांसाठी एक चांगले, अधिक समावेशक जग निर्माण करण्यासाठी समर्पित आहोत.
आपल्या संस्थेची समाजासाठी आजपर्यंत केलेली कार्य
१. गरजू आणि जेष्ठ नागरिकांसाठी 'मोफत आरोग्य शिबिर २०२३ सोनवडी येथे.
२. 'श्री स्वामी समर्थ' यांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा २०२२ नन्हे, पुणे.
३. 'श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे अभिषेक व पुजन सोहळा २०२२' नन्हे, पुणे.
४. 'तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू' समारंभ २०२३ नन्हे, पुणे.
५. 'सोमजाई देवीचा उत्सव' घोलपघर २०२२.
६. 'श्री भैरवनाथांचा उत्वस' घोलपघर २०२२.
७. 'श्री संत ज्ञानेश्वर पारायण सोहळा' व 'अखंड हरिनाम सप्ताह' २०२२. 'श्री विठ्ठल रखुमाई मंदिर घोलपघर'
८. २६ जानेवारी 'प्रजासत्ताक दिन' सोहळा घोलपघर २०२३.
९. 'ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडी सोहळा २०२२' घोलपघर.
१०. 'काळूबाई देवीचा उत्सव' मांढरेमळा २०२३
आपल्या संस्थेची समाजातील जनतेसाठी पुढील वाटचाल
१. समाजासाठी 'सांस्कृतीक भवन' निर्माण करणे.
२. जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र चालू करणे.
३. जनतेसाठी 'मोफत वाचनालय' चालू करणे
४. समाजातील नागरिकांसाठी 'ग्रंथालय व व्यायामशाळा' चालू करणे.
५. 'सामुदायिक विवाह सोहळा' राबविणे.
६. समाजातील लोकांसाठी 'मोफत आरोग्य सेवा' पुरवणे.
७. वनवक्षेत्र वाढविण्यासाठी व प्रदुषण रोखण्यासाठी झाडे लावणे.
८. समाजातील गरजू मुलांसाठी 'शाळा व महाविद्यालये' स्थापन करणे.
९. विविध सणांचे व पारंपारिक सण सोहळे यांचे आयोजन करणे.
१०. समाजातील बेरोजगार तरुणांसाठी 'शासनाकडून मिळणाऱ्या सवलती' व योजनांची समाजास माहिती देवून तसेच योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना मदत करणे.
